RTO Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्चअखेर सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

RTO Pimpri Chinchwad | नवीन वाहन नोंदणी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या करवसुलीची रक्कम शासकीय तिजोरीत जमा होण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या शुक्रवार २९ मार्च ते रविवार ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.

सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील महसूली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्चअखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने गुड फ्रायडे २९ मार्च, शनिवार ३० मार्च व रविवार ३१ मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवीन वाहन नोंदणी व त्याअनुषंगीक करवसुलीचे कामकाज तसेच इतर परिवहन विषयक कामकाज जसे थकीत कर वसुली व खटला विभागाचे (महसूल जमा होणारे कामकाज) कामकाज कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन (RTO Pimpri Chinchwad) अधिकारी अतुल आदे यांनी कळविले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?