सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत – पवार

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपने (BJP) एकत्र येत स्थापन केलेल्या सरकारने सोमवारी विधानसभेत बहुमताचा ठराव १६४ विरुद्ध ९९ अशा मतांच्या फरकाने जिंकला. यानंतर अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सलग दुसऱ्या दिवशी सभागृहात जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव (Confidential resolution) जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हे जोरदार भाषण केलं. अजित पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) चिमटे काढले. एवढेच नव्हे तर बंडखोर आमदारांनाही टोले लगावले.

देवेंद्र फडणवीस या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान (Lucky) कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. असं देखील ते म्हणाले.