हे रावणाच्या खानदानातील लोक; सनातन धर्माबद्दल गरळ ओकणाऱ्या उदयनिधींवर धीरेंद्र शास्त्रींची टीका

Udhayanidhi Sanatana Remarks:  INDIAआघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या आणि तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी गरळ ओकली आहे. त्याने केलेल्या विधानावरून मोठा गोंधळ सुरु आहे.

एका सभेला संबोधित करताना उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. उदयनिधीच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांकडून टीका होत असून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.उदयनिधीने शनिवारी सनातन निर्मूलन परिषदेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असं वक्तव्य करत त्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी उदयनिधी यांना ‘रावणाच्या खांनदानातील लोक’ असे म्हटले आहे.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, “रावणाच्या खानदानातील लोक आहेत. जर भारतात राहणाऱ्या एखाद्या भारतीयाने असे म्हटले असेल, तर भारतात राहणाऱ्या संपूर्ण सनातनी लोकांच्या हृदयावर त्यांनी आघात केला आहे. हा प्रभू रामचंद्रांचा देश आहे. या भूमीवर सूर्य आणि पाणी राहील तोवर सनातन राहील. असे लोक भरपूर आले आणि गेले. अशा जनावरांना उत्तर देण्याची गरज नाही.” असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Udayanidhi : ‘या लोकांना सनातन हिंदु धर्म कधीच समजू शकला नाही आणि भविष्यातही समजू शकणार नाही’

पेढे वाटा पेढे…. जसप्रीत बुमराह बनला बाबा, पत्नी संजनाने गोंडस मुलाला दिला जन्म

“लाठीमारासाठी वरून आदेश आले हे सिद्ध करा, मी…’’ अजित पवारांचं थेट आव्हान

‘बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले नसते, तुमचे विचार…’, नारायण राणेंची सडकून टीका