दीपिकाने नाकारल्यावर ‘या’ अभिनेत्रीने आमिर खानसोबत रोमान्स केला, ब्लॉकबस्टर चित्रपटाने छापले 500 कोटी

Deepika Padukone : लोकप्रिय स्टार्सच्या यादीत कतरिना कैफचा (Katrina Kaif) समावेश आहे. तिने आपल्या कारकिर्दीत एक सुपरहिट चित्रपट दिला आहे. तिचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ‘धूम 3’ या चित्रपटात तिने आमिर खानसोबत जबरदस्त रोमान्स केला होता पण या चित्रपटासाठी ती निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. होय! ‘धूम 3’ याआधी दीपिका पदुकोणला ऑफर करण्यात आला होता, पण तिने नकार दिला होता.

आमिर खानच्या ‘धूम 3’ मध्ये कतरिना कैफने आलियाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दोन्ही स्टार्सची जोडी खूप आवडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी याआधी दीपिका पदुकोणला आलियाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला होता, परंतु त्यावेळी ती अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होती. याच कारणामुळे दीपिका पदुकोणने ‘धूम 3’मध्ये काम करण्यास नकार दिला होता.

आमिर खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांनी विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित ‘धूम 3’ या चित्रपटात काम केले होते. 2013 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ‘धूम 3’ ने जगभरात 556.74 कोटी रुपयांचा मोठा व्यवसाय केला.

दीपिका पदुकोण शेवटची ‘जवान’ चित्रपटात दिसली होती. आता ती ‘फाइटर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये हृतिक रोशन पहिल्यांदाच दीपिका पदुकोणसोबत जोडी करताना दिसणार आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत असून पुढील वर्षी 2024 मध्ये तो चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…