न्यूझीलंड दौऱ्यावर राहुल द्रविड नव्हे तर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे असणार प्रशिक्षक म्हणून जबाबदारी

नवी दिल्ली – टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफला T20 विश्वचषकानंतर ब्रेक देण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण या कालावधीत मुख्य प्रशिक्षक असतील.(VVS Laxman, not Rahul Dravid, will be the coach for the tour of New Zealand)

गुरुवारी उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभूत होऊन भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला. आता भारताला न्यूझीलंडमध्ये तीन टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 18 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनमध्ये टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली, केएल राहुल आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.