सनातन धर्म आणि हिंदी भाषिक राज्यांवर विधाने करू नका; पराभवाने काँग्रेस दुखावली, द्रमुकला दिला सल्ला

Congress Advised To DMK:आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर INDIAआघाडीच्या हालचाली तीव्र होऊ शकतात. तत्पूर्वी, काँग्रेसने आपल्या सहयोगी द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षाला भविष्यात त्यांच्या वक्तव्यांबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: ज्या विधानांमुळे काँग्रेस पक्षाचे अलीकडे ‘हिंदी बेल्ट’ राज्यांमध्ये मोठे राजकीय नुकसान झाले आहे.

पुढील वर्षाच्या पूर्वार्धात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत . पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या ‘इंडिया अलायन्स’नेही सार्वत्रिक निवडणुकांसाठी आपली रणनीती तयार करण्यास सुरुवात केली आहे. तथापि, याआधी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि द्रमुकला भूतकाळात दिलेल्या विधानांवर भविष्यात अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

ABPच्या वृत्तानुसार, द्रमुकचे नेते आणि तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘सनातन धर्मा’संदर्भातील विधानामुळे निवडणुकीत विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसचे बरेच नुकसान झाले, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भाजप आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक जाहीर सभांमध्ये सनातन धर्म नष्ट करण्याच्या ‘इंडिया आघाडी’ मित्र पक्षांच्या विधानांवरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. देशात सनातन धर्म आणि हिंदू धर्माच्या विरोधात सतत विष पसरवणाऱ्या अशा पक्षांचा समर्थक आणि सहयोगी असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki