Video: लाल सदरा, डोक्यावर सुटकेस; काँग्रेसचे खासदार राहुल गांधी बनले कुली

Rahul Gandhi In Collie Look: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे नेहमी आपल्या आगळ्यावेगळ्या कृतीने जनतेचे लक्ष वेधत असतात. त्यांचे ट्रक चालवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर आता राहुल गांधींनी आनंद विहार रेल्वे स्टेशनवरील कुलींची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी कुलीच्या वेशात डोक्यावर सुटकेस घेऊन फेरीही मारली. त्यांच्या या अनोख्या अंदाजाने जनतेचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

राहुल गांधी आज सकाळीच आनंद विहार रेल्वे स्थानकावर आले होते. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या कुलींशी चर्चा केली. त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना होणारी मिळकत, त्यातून त्यांचं भागतं का आदी माहितीही त्यांनी घेतली. तसेच त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे याची विचारणाही त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी या कुलींशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. त्यानंतर राहुल गांधी यांनी कुलींनी दिलेला त्यांचा गणवेश घातला. डोक्यावर सुटकेसही घेतली. काही काळ रेल्वे स्टेशनवर दिसले. राहुल गांधी यांचा हा कुलींच्या वेशातील फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-