श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाला पुण्यात सुरुवात

Pune – अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याच्या ‘दो धागे श्रीराम के लिए’ या उपक्रमाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी उपक्रमाचे पाहिले धागे धागे विणून सुरुवात केली.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य मार्गदर्शक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका अनघा घैसास (Bhaiyyaji Joshi of Rashtriya Swayamsevak Sangh, Treasurer Swami Govind Dev Giri Maharaj, Deputy Speaker of Legislative Council Dr. Neelam Gorhe, State Minister for Higher and Technical Education Chandrakant Patil, Director of Heritage Handweaving Revival Charitable Trust Angha Ghaisas.)  यावेळी उपस्थित होत्या.

उद्घाटनानंतर २२ डिसेंबर पर्यंत पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी येथे उपलब्ध करून दिलेल्या हातमागावर विणता येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki