मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होतो का? किशोरी पेडणेकर ठामपणे म्हणाल्या…

 मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम बस बाई बस या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांची मुलाखत होते. या कार्यक्रमात राजकारणी मंडळीदेखील सहभागी होत असतात. या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं जातं.या कार्यक्रमात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) सहभागी झाल्या होत्या.यावेळी त्यांनी काही महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले.

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलीये. अश्यात किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत या कार्यक्रमात महत्वाचं विधान केलंय.  यावेळी त्यांना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार होत नाही, असं त्या म्हणाल्या.