‘पिणारा कुठे तरी जातोच ना ?’ बाळासाहेब थोरातांनी लढवला अजब तर्क

शिर्डी : महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. त्यावर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी यासंबंधीची माहिती दिली.

राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार 1 हजार कोटी लिटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकारनं पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे. दरम्यान ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर आता विरोधी पक्ष असलेला भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे. तर हा निर्णय मागे घ्यावा असा दबाव विरोधीपक्षांकडून महाविकास आघाडी सरकारवर केला जात आहे.

याउलट महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मात्र हे समर्थन करताना बाळासाहेब थोरात अजब तर्क लढवला आहे. ‘असं हे , तसं तर पिणारा कुठे जातोच ना ? आज जो विरोध होतोय तो अनेक नविन गोष्टींमध्ये दोन्ही बाजू असु शकतात म्हणून होत आहे. तर, वाईन आणि दारू यात बराच फरक असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. वाईन हे शेतकऱ्याचं उत्पादन नाशिक जिल्हयातील शेतक-यांनी मोठ्या धाडसाने काही गोष्टी केल्या’. असं देखील थोरात म्हणाले आहेत.