कॉंग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली; द्रौपदी मुर्मु यांना तब्बल १६ आमदारांनी केले मतदान

मुंबई – राष्ट्रपतीपदी एनडीएच्या (NDA)उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांनी विजय मिळवलाआहे. त्यांनी युपीए आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.या निवडणुकीत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट, भाजपा यांच्या व्यतिरिक्त शिवसेना खासदारांच्या भूमिकेमुळे या तिघांनीही द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याव्यतिरिक्त द्रौपदी मूर्मू यांना राज्यातील 16 जास्त आमदारांची मते मिळाल्याची माहिती आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटलेली 16 मते ही काँग्रेस-राष्ट्रवादीतील असल्याचाच दाट संशय आहे. कारण शिवसेनेने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. देशभरात 104 आमदरांची मते फुटली असून, ते क्रॉस वोटिंग द्रौपदी मुर्मु यांना मिळाली आहेत. त्यातील 16 मते राज्यातील आहेत. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे.