‘तुमच्यासारख्या टेकड्यांना हिमालयाची उंची लक्षात येणार नाही’, संजय राऊतांच्या चंद्रकांतदादांना टोला

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. शरद पवार पंतप्रधान कधी होतील? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला आता संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘शरद पवारांविषयी बोलण्यासाठी आधी राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याइतक्या व्यक्तीमत्वाची उंची गाठावी. तुमच्यासारख्या टेकड्यांना सह्याद्री किंवा हिमालयाची उंची लक्षात येणार नाही.’ असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

तर, ‘एखादी व्यक्ती पंतप्रधानपदी बसल्यामुळे मोठी होत नाही. पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची पंतप्रधानपदी बसण्यापूर्वीच मोठी होती, असं संजय राऊत म्हणाले. तसेच अनेक चांगल्या व्यक्ती पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत’, अशीही खंत राऊतांनी यावेळी व्यक्त केली.