हिच्यामुळे सलमान इतके वर्ष होता बिनलग्नाचा, शेवटी मनातलं ओठांवर आलंच..! व्हिडिओ व्हायरल

Salman Khan Marriage: आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) सध्या त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. होळीच्या निमित्ताने आयुष्मानने त्याच्या ड्रीम गर्ल 2 चा टीझर (Dream Girl 2 Teaser) रिलीज करून चाहत्यांना एक खास भेट दिली होती. त्याचवेळी आता ईदच्या निमित्ताने या चित्रपटाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये आयुष्मानला पूजाच्या (Pooja) लूकमध्ये पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाचा नवीन टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये आयुष्मानचा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे. टीझरमध्ये आयुष्मान खुराना पूजाच्या रूपात फोनवर बोलत असताना म्हणतो, ‘हॅलो मी पूजा बोलत आहे, तू कोण आहेस?’

तेवढ्यात फोनच्या पलीकडुन आवाज येतो, ‘मी बोलतोय.’ पूजा म्हणते ‘अरे भाई डियर… ईद आली नाही, तू आलास.’ तेवढ्यात पलीकडून आवाज येतो, ‘भाऊ, मी इतरांसाठी आहे… मी फक्त तुझ्यासाठी जान आहे. मी अजूनही अविवाहित आहे. तुझ्यामुळे माझं लग्न अजिबात झालं नाही. यावेळी पूजा माझी होईल असे ऐकले आहे. तू तुझा चेहरा कधी दाखवतेस?’

यानंतर पूजा जोरात खिडकी उघडते आणि म्हणते, ‘हा पाहा व्हिडिओ कॉल उचल. अरे लाईट गेली. आता ईदचा चंद्र बघ… माझा चेहरा ७ जुलैला. तेव्हा भाई जान म्हणतो, ‘महिलांनी मला नेहमीच अंधारात ठेवले, मी बॅचलरच बरा आहे.’ या टीझरला प्रेक्षकांकजून खूप पसंती दर्शवली जात आहे.