निसर्गाच्या कृपेमुळे वडशिवणे तलाव भरला;ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना 

करमाळा – गेल्या अनेक दिवसांपासून वडशिवणे ग्रामस्थ ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. वडशिवणे गावातील तलाव निसर्गाच्या कृपेमुळे भरला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तलाव भरून सांडवा वाहिलेला आहे.

दरम्यान, या मंगल क्षणी या तलावातील जलपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी वडशिवणे ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाठक, समाजिक कार्यकर्ते विठ्ठल बाबर, सोमनाथ मगर, नामदेव जगदाळे, माजी उपसरपंच रवींद्र पोकळे, आप्पा अंधारे, निळू लोंढे, भुजुंग तोरस्कर, श्रीमंत कावडे, नाना साळुंखे, हनुमंत जगदाळे, योगेश वनवे, समीर मणेरी, सुखदेव सावंत, समीर जगदाळे आदी मंडळी उपस्थित होते.

वडशिवणे तलाव बऱ्याच कालावधीनंतर भरल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद साजरा केला जात आहे. हाच आनंद व्यक्त करण्यासाठी पेढे, साखर वाटून तसेच फटाके फोडून जल पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. बऱ्याच दिवसाची मागणी होती की दहेगाव उपसा सिंचन च्या पाण्याने वडशिवने तलाव भरण्यात यावा परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनपणामुळे हा दहीगावचे तलावामध्ये दहेगावचे पाणी आलेच नाही पण निसर्गाच्या कृपेमुळे वडशिवणे तलाव भरून सांडवा वाहत आहे.