हमारी अधुरी कहानी! …यामुळे हेमा मालिनी यांचे नाही होऊ शकले संजीव कुमारसोबत लग्न

मुंबई – आपल्या काळातील प्रसिद्ध स्टार संजीव कुमार (Sanjeev Kumar) केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत आहेत. संजीव कुमार आयुष्यभर अविवाहित राहिले आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे अभिनेत्याने ज्या अभिनेत्रीवर प्रेम केले तिच्याशी लग्न करू शकले नाही. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी (Hema Malini) होती. होय, मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजीव आणि हेमाच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती; जेव्हा दोघेही काही काळासाठी एकमेकांच्या जवळ आले होते. ‘सीता और गीता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातामुळे त्यांच्यातील जवळीक वाढली होती. संजीव कुमार आणि हेमा दोघेही एकमेकांना पसंत करू लागले, पण इथे एक पेच होता.

खरं तर, संजीव कुमार यांनी लग्नाबाबत आपल्या आईशी ज्यावेळी चर्चा केली, तेव्हा त्यांच्या आईने अशी मागणी केली ज्यामुळे संपूर्ण प्रकरणच उलटले. वास्तविक संजीव कुमारच्या आईला हेमाने लग्नानंतर चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते आणि हेमालाही हेच आवडत नव्हते.(Love story Of hema malini)

एका मुलाखतीत याविषयी बोलताना हेमा म्हणाल्या होत्या, ‘संजीव कुमार यांना अशी पत्नी हवी होती जी त्यागाची मूर्ती असेल, ती त्यांचे घर सांभाळेल, वृद्ध आई-वडिलांची काळजी घेईल आणि पतीसाठी करिअरचा त्यागही करेल. परफेक्ट लाईफ पार्टनर आणि अशी परफेक्ट माणसं खऱ्या आयुष्यात मिळत नाहीत.