Babar Azam | विराट-रोहित नव्हे पाकिस्तानचा बाबर आझमच ‘टी२०चा किंग’, केल्या सर्वात वेगवान १० हजार धावा

Babar Azam 10 Thousand T20 Runs: सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग 2024 (PSL 2024) मध्ये बाबर आझमची (Babar Azam) बॅट जोरदार गर्जत आहे. पेशावर जाल्मीच्या कर्णधाराने टी20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. लीगच्या सहाव्या सामन्यात त्याने अशी कामगिरी केली, ज्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. बाबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेल आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर (Babar Azam)आझमने टी20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो 13वा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे बाबरने 271 डावात हा टप्पा गाठला आहे. या बाबतीत त्याने भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. किंग कोहलीने टी20 क्रिकेटच्या 299 डावांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

ख्रिस गेलला मागे टाकत बाबरने अव्वल स्थान गाठले
बाबरच्या आधी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या बाबतीत आघाडीवर होता. त्याने 285 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र, आता बाबरने त्यालाही मागे सोडले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नरचे नाव आहे, ज्याने 327 डावांत हे स्थान गाठले. 327 डावात सर्वात जलद 10 हजार धावा करणारा ॲरॉन फिंच चौथा फलंदाज ठरला. त्याचवेळी जोस बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये 350 डावांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा पूर्ण करणारा फलंदाज
271 डाव- बाबर आझम
285 डाव – ख्रिस गेल
299 डाव- विराट कोहली
327 डाव- डेव्हिड वॉर्नर
327 डाव- आरोन फिंच
350 डाव- जोस बटलर

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल