Eknath Shinde | पैलवान असल्याने राजकारणात कुठला डाव टाकायचा हे मुरलीधरांना माहित आहे

Eknath Shinde On Murlidhar Mohol | महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराकरीता आज पुण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली. तर मुरलीधर मोहोळ हे पैलवान असल्याने राजकारणात कुठला डाव टाकायचा हे त्यांना माहित आहे, असे मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले, मुरलीअण्णांच्या कुटुंबाला पैलवानकीचा वारसा आहे.  महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे.  त्यामुळे पैलवान असल्याने कधी कुठे डाव टाकायचं हे त्यांना माहिती आहे. हा आखाडा तर मुरली मोहोळ जिंकणारच. स्वार्थासाठी आखाडा बदलणारा पैलवान आपल्या पैलवानसमोर टिकणार नाही. असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

“पुण्यात भाऊ, तात्या कोणी नाही, तर मुरलीधर मोहोळच निवडून येणार”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Ajit Pawar | “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले

Vasant More | रवींद्र धंगेकर आमदार होऊनही कसब्यात विकासकामे झाली नाहीत