रोटरी क्लब आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आला ‘हा’ नवा उपक्रम

पुणे – रोटरी क्लब पुणे सेंट्रल आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटना (Rotary Club Pune Central and Pune City Boxing Association) यांच्या संयुक्त विद्यमाने शी कॅन अँड शी विल असा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात पुणे शहरातील गुणवत्ता प्राप्त महिला खेळाडू यांना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. खेळाडू यांना त्यांच्या डायट प्लान बाबतीत मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर आयोजित केले जाणार आहे.

सुरुवातीला पुणे शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी बजावली असणाऱ्या झीनत शेख, भूमिका खिलारे, हर्षदा लोहाट, रिया कुटे, सोनिया सूर्यवंशी, सृष्टी चोरगे,वैष्णवी कदम, समीक्षा सूर्यवंशी याआठ महिला खेळाडूंची निवड या उपक्रमासाठी करण्यात आली आहे या शिबिरात पुणे शहरातील इतर बॉक्सिंग प्रशिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे.

या उपक्रमामुळे पुणे शहरातील खेळाडू यांच्या गुणवत्तेत भर पडून त्याचा उपयोग पुढील स्पर्धा मधील कामगिरी सुधारण्यास नक्कीच होईल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या प्रशिक्षकांसोबत शिबिरात काम करण्याच संधी पुणे शहरातील इतर प्रशिक्षकांना मिळणार असल्याने पुणे शहरातील सर्वच खेळाडू यांना भविष्यात लाभ होईल असा विश्वास पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे (Avinash Bagawe) यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पुणे शहरातील खेळ संस्कृतीच्या वाढीसाठी अश्या प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याने इतरही संघटनांनीपुढे यावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी रोटरी क्लब पुणे सेंट्रलचे ब्रि.मुरलीधरन राजा(Muralidharan Raja) आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे आभार व्यक्त केले ह्या चांगल्या उपक्रमास यशस्वी होण्यासाठी जी काही मदत लागेल ती संघटनेच्या माध्यमातून दिली जाईल याची ग्वाही दिली.

महत्वाच्या बातम्या-