Kapil Dev | कपिल देवच्या हस्ते मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथे ऑर्थोपेडिक्स उपचारांसाठी प्रगत रोबोटिक टेक्नॉलॉजीचे अनावरण

पुणे | मणिपाल हॉस्पिटल, खराडीने येथे आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, फिटनेस बाबत जागरूक असणाऱ्या, पद्मभूषण कपिल देव (Kapil Dev) यांच्या हस्ते उन्नत ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजी प्रस्तुत करण्यात आली. या टेक्नॉलॉजीचा उद्देश पुणे (Kapil Dev)आणि आसपासच्या शहरांत रोबोटिक असिस्टेड सर्जरी सह नी-रिप्लेसमेंट आणि सांध्यांवरील उपचार अधिक चांगले आणि प्रभावी बनवण्याचा आहे.

गेल्या पाच वर्षांत भारतात जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीजची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. देशभरातील सर्जन्सद्वारे दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर नी-रिप्लेसमेंट सर्जरी करण्यात येते आणि गेल्या काही वर्षांत ही संख्या काही पटींनी वाढली आहे. काही वर्षांपासून मणिपाल हॉस्पिटल, खराडीमध्ये देखील नी-रिप्लेसमेंट सर्जरीजची संख्या वाढली आहे. भारतात आलेल्या नवीन आणि अधिक प्रगत टेक्नॉलॉजीमुळे संपूर्ण नी-रिप्लेसमेंट सर्जरी केल्यानंतर रुग्ण अवघ्या सहा तासांत चालण्यास सुरुवात करू शकतो. ऑर्थोपेडिक उपचार आणि रोबोटिक असिस्टेड ऑर्थोपेडिक सर्जरीतील प्रगतीमुळे नी-रिप्लेसमेंटशी संबंधित धोके देखील कमी झाले आहेत.

रोबोटिक असिस्टेड सर्जरी एका सर्जनच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक उपकरणांची मदत घेऊन केली जाणारी एक उन्नत वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रिया सर्जन्सना नेमक्या उपकरणांनी आणि प्रगत प्रणालीने जटिल सर्जरी करण्यास सहाय्यभूत ठरतात आणि त्यात रक्तस्राव व रिकव्हरी समय देखील कमी होतो.

उन्नत रोबोटिक टेक्नॉलॉजीचे अनावरण करताना जेष्ठ क्रिकेटपटू कपिल देव म्हणाले, “जॉइंट रिप्लेसमेंटसाठी हे नाविन्यपूर्ण आणि प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान आणल्याबद्दल मी मणिपाल हॉस्पिटल खराडीचे अभिनंदन करू इच्छितो. क्रिकेटमध्ये अधिक चांगल्या परफॉर्मन्ससाठी आम्ही सतत आमची उपकरणे आणि टेकनिक सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे, रोबोटिक असिस्टेड सर्जरीसारख्या हेल्थकेअर क्षेत्रातील प्रगतीमुळे ऑर्थोपेडिक समस्यांनी पीडित लोकांना उपचाराचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. एक खेळाडू म्हणून मी सांध्याच्या दुखापतीचे परिणाम आणि त्यातून लवकर बरे होण्याचे महत्त्व समजू शकतो आणि मणिपाल हॉस्पिटलची ही नवीन रोबोटिक टेकनिक या शहरात उपलब्ध ऑर्थोपेडिकशी संबंधित उपचारांच्या पर्यायांमध्ये गेम-चेंजर आहे. ही टेकनिक जलद रिकव्हरी, कमी वेदना आणि सक्रिय जीवनशैलीत झपाट्याने परतणे संभव बनवते.”

रोबोटिक सर्जरीच्या गरजेवर भर देत मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील अॅडल्ट जॉइंट रिप्लेसमेंट आणि रीकन्स्ट्रकशन तसेच रोबोटिक आर्थोप्लास्टी (हिप आणि नी) डॉ. सिनुकुमार भास्करन म्हणाले, “रुग्णांना अधिक चांगले परिणाम देणे यावर आमचे लक्ष केंद्रित आहे आणि ही रोबोटिक टेकनिक दर्जेदार ऑर्थोपेडिक उपचार देण्याच्या दिशेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रोबोटिक असिस्टेड सर्जरी ही केवळ जटिल शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसाठी फायदेशीर नाही, तर रुग्णांसाठी देखील फायद्याची आहे कारण ती लवकर बरे करते, वेदना कमी करते आणि शस्त्रक्रियेनंतर जीवनमान सुधारते. ही नवीन प्रणाली पर्सनलाईझ्ड 3D सीटी स्कॅनची सुविधा देते, ज्यामुळे अधिक अचूक इम्प्लांट सर्जरी करण्यासाठी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रियल टाइममध्ये हाडाच्या हालचालीच्या देखरेखीसह सब-मिलीमीटरची अचूकता आणि अधिक चांगली सुरक्षा मिळते. 98% सफलता दरासह या अचूकतेमुळे जॉइंट रिप्लेसमेंट अधिक काळ टिकणारे असते आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा महागड्या आणि कापाकापीच्या शास्त्रक्रियांची गरज कमी होते. या टेक्नॉलॉजीचा आणि आमच्या अनोख्या क्लिनिकल पाथवेचा उपयोग करून आमचे हॉस्पिटल रुग्णांसाठी फास्ट-ट्रॅक सर्जरी सादर करते, ज्यामुळे रुग्ण 24 तासांच्या आत घरी जाऊ शकतो.

या प्रसंगी बोलताना मणिपाल हॉस्पिटल, खराडीचे संचालक परमेश्वर दास म्हणाले, “मणिपाल हॉस्पिटल खराडी येथे आम्ही जे काही करतो, त्याच्या केंद्रस्थानी वैद्यकीय उत्कृष्टता आणि रुग्णांचे कल्याण असते. आमच्या रुग्णांना नवीन आणि उन्नत टेकनिक असलेली हेल्थकेअर देण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. या उन्नत रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या आगमनामुळे नेमकेपणा, सुरक्षा आणि रुग्णांवरील अधिक चांगल्या परिणामावर भर देणाऱ्या ऑर्थोपेडिक सर्जरीच्या नवीन युगाची सुरुवात झाली आहे. ही नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजी आम्हाला आमच्या रुग्णांना जलद रिकव्हरी, नेमकेपणा आणि त्यायोगे अधिक चांगले जीवनमान यांची संभावना वाढवणारी कमीत कमी कापाकापीची प्रक्रिया प्रदान करण्याची मुभा देते.”

रुग्ण-केंद्रित देखभालीच्या बाबतीत आघाडीवर असलेले मणिपाल हॉस्पिटल, खराडी आपल्या रुग्णांना निरंतर हेल्थकेअर टेक्नॉलॉजीतील नवनव्या प्रगती प्रदान करण्यास कटिबद्ध आहे आणि ही प्रगत रोबोटिक टेक्नॉलॉजी सामील करणे हे दिशेत उचललेले आणखी एक मोठे पाऊल आहे. आपली अत्याधुनिक, हाय-टेक रोबोटिक उपकरणे आणि सुविधा तसेच अनुभवी वैद्यकीय चमू यांसह हे हॉस्पिटल आपल्या रुग्णांना समाधान आणि शक्य तितकी चांगली देखभाल प्रदान करणे चालू ठेवेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब