मुंबई इंडियन्सविरुद्ध लखनऊच्या दिपक हुड्डाने केली फिक्सिंग? ‘त्या’ चुकांमुळे होतोय गंभीर आरोप

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धचा आयपीएल २०२३ मधील एलिमिनेटर सामना (Eliminator) ८१ धावांनी जिंकत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) प्रवेश आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने कॅमरॉन ग्रीनच्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ संघाला १६.३ षटकात १०१ धावाच करता आल्या. दरम्यान हा सामना एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर लखनऊचा फलंदाज दिपक हुड्डा (Deepak Hooda) याने मुंबईविरुद्ध मॅच फिक्सिंग केली असल्याची चर्चा रंगली आहे.

त्याचे झाले असे की, दिपक हुड्डा नॉन स्ट्राईकवर असताना लखनऊचे दोन फलंदाज धावबाद झाले. त्यानंतर खुद्द दिपक हुड्डाही धावबादचा शिकार बनला. यामुळे हुड्डावर प्रश्नचिन्ह उपस्थित (Match Fixing) करण्यात येत आहे.

लखनऊच्या डावातील बाराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या मार्कस स्टॉइनिसने एक धाव काढली. मात्र त्यानंतर हुड्डा दुसऱ्या धावेसाठी पळाल्याचे पाहून स्टॉयनिसही पळाला आणि टीम डेविड व यष्टीरक्षक इशान किशन यांनी मिळून त्याला धावबाद केले. १२.३ षटकातही कृष्णप्पा गौतम अगदी अशाच पद्धतीने धावबाद झाला. यावेळी हुड्डा नॉन स्ट्राईकवर होता. इतकेच नव्हे तर, १४.५ षटकात नवीन उल हकदेखील धावबाद होता होता वाचला.

https://twitter.com/Avhi48044866/status/1661423603244744704?s=20

नवीनने चेंडू मारला परंतु क्षेत्ररक्षकाने लगेच चेंडू पकडल्याचे पाहून तो पुन्हा क्रिझकडे वळाला आणि डाइव्ह मारत त्याने आपली विकेट वाचवली. मात्र तोवर हुड्डा क्रिजच्या बाहेर आल्याने तो धावबाद झाला. अशाप्रकारे हुड्डामुळे लखनऊने महत्वाच्या विकेट्स गमावल्यामुळे चाहते त्याच्या फिक्सिंगचा आरोप करत आहेत.