रोजगार इच्छुक उमेदवारांकरीता ४२५ रिक्तपदांवर रोजगाराची संधी

वाशिम : राज्यातील नामांकित नियोक्तांकडुन प्राप्त मनुष्यबळ मागणीनुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्र, वाशिम या कार्यालयासह अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ३० व ३१ मार्च २०१२ रोजी ऑनलाईन पध्दतीने आयोजित केला आहे. या ऑनलाईन विभागीय रोजगार मेळाव्यात वाशिम जिल्हयासह राज्यातील नामांकित कंपन्या/आस्थापनांमध्ये ४२५ रिक्त जागेवर रोजगार मिळविण्याची संधी विभागातील नोकरी इच्छुक उमेदवारांना याद्वारे प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने अमरावती विभागाच्या सर्व जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे.

रोजगार मेळाव्यात इयत्ता १० वी, १२ वी, आय.टी.आय. (सर्व शाखा)/ स्थापत्य-मेकॅनिक-ईलेक्ट्रॉनिक्स पदवीधर व पदविकाधारक/इतर सर्वशाखीय पदवीधर असणाऱ्या रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधुन मेळाव्यात सहभागी होता येईल. त्यानुसार सहभागी झालेल्या उमेदवारांना उद्योजकांकडुन ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव विचारात घेवून मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

तरी अमरावती विभागातील सर्व जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी या विभागीय रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने ३० व ३१ मार्च २०२२ दरम्यान पसंतीक्रम सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंन्द्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्याची प्रक्रीया/पध्दत पुढीलप्रमाणे आहे. यासाठी आपणाकडे एम्पॉलमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा. त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दिनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर Click करावे. येथे आपणांस वाशिम जिल्हा निवडुन त्यातील AMRAVATI DIVISIONALJOB FAIR (दि.२९ ते ३१ मार्च २०२२) मध्ये नमुद पात्रतेनुसारच्याच पदांवर अप्लाय करावे. त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल. या पध्दतीने आपण या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेले असाल. अधिक माहितीकरीता कार्यालयाच्या ०७२५२-२३१४९४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे जिल्हा कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, सुनंदा बजाज यांनी कळविले आहे.