‘पुन्हा एकदा भावी पतंप्रधानपदासाठी फिल्डिंग जोरदार सुरू केली आहे…! काय आत्मविश्वास…!’

अक्कलकोट –  पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपचा जलवा पाहायला मिळाला आहे. यामुळे विरोधक धास्तावले असून विरोधकांची एकी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भूमिका निर्णायक बजावू शकतात अशी काहींना आशा आहे. यातूनच आता शरद पवारांनी (Sharad Pawar)संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद घ्यावं यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला आहे.

दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवारदेखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. त्यामुळे एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्तावरुन वादंग सुरु असतानाच दुसरीकडे शरद पवारांकडे युपीएच्या नेतृत्वावरुनही घमासान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता याच मुद्यावरून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी (sachin kalyanshetti) यांनी पवारांना टोमणा मारला आहे. ते म्हणाले, लोकसभेत सगळे मिळून ५ खासदार आणि तब्बल ०.९३% मते घेऊन पुन्हा एकदा भावी पतंप्रधानपदासाठी फिल्डिंग जोरदार सुरू केली आहे…! काय आत्मविश्वास…! असा टोमणा त्यांनी मारला आहे.