33 वर्षांनंतरही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जमुनाबाईचे 2 रुपये विसरले नाहीत

CM Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशातील निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सीएम शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chauhan) यांचा असाच एक किस्सा समोर आला आहे, जे सांगताना ते स्वतः भावूक झाले आहेत.

आज जहाजपूरमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. सीएम शिवराज यांना भेटण्यासाठी एक वृद्ध महिला आली, तिचे नाव जमुनाबाई होते. सीएम शिवराज सिंह चौहान यांनी जमुनाबाईंना पाहिले आणि तिच्या पायाला स्पर्श करून मिठी मारली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत होतो तेव्हा जमुनाबाईंनी त्यांना आशीर्वाद दिला होता आणि निवडणूक लढवण्यासाठी 2 रुपयेही दिले होते.

आज मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जमुनाबाईंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. जमुनाबाईंनीही मुख्यमंत्र्यांना पूर्ण आशीर्वाद दिला. आपल्या आठवणींना उजाळा देताना शिवराज म्हणाले की, 1990 मध्ये बुधनीमधून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवत असताना जमुनाबाईंनी त्यांना खूप आशीर्वाद दिले होते. सोबतच त्यांना 2 रुपये दिले आणि निवडणूक लढवून चांगली प्रगती करा असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जमुनाबाईंना मिठी मारून आशीर्वाद घेतल्यावर अनेकजण भावूक झाल्याचे दिसले. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात लोकांना सांगितले की, बुधनीच्या लोकांसाठी ते मुख्यमंत्री नसून भाऊ आणि काका आहेत.

महत्वाच्या बातम्या-