‘वा रे महावसुली सरकार….! यांना मनाची तर नाहीच जनाचीही नाही !’

मुंबई : राज्याचे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदुर बाजार येथील प्रथम वर्ग एक ने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी मुंबई येथील फ्लँट लपवल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे अमरावतीतील अचलपूरचे नगरसेवक गोपल तिरमारे यांनी यांसदर्भात तक्रार दाखल केली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या माहिती पत्रात माहिती लपवल्याची त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. यांसदर्भात भाजपचे नगरसेवक गोपल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी मुंबईतील चांदुरबाजार येथील न्यायालयात चालू होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, आता भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये ते म्हणतात, निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवली म्हणून राज्य मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरवून दोन महिने कारावास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. अमरावती जिल्ह्यात 2 मंत्री आणि दोघेही न्यायालयाने दोषी ठरवलेले ! वा रे महावसुली सरकार !! यांना मनाची तर नाहीच जनाचीही नाही ! असं त्यांनी म्हटले आहे.