आमचे अनेक गट असले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही एकजूट होतो – रामदास आठवले

Ramdas Athwale – रिपब्लिकन पक्षात (Republic Party) अनेक गट आहेत. नेत्यांच्या नावाने गटबाजी असली तरी समाज आमचा एक आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावा साठी आम्ही सर्व एकजूट होतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) नावासाठी आमच्या समाजाचे ऐक्य कायम आहे कायम राहिल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर लढा आमच्या समाजाच्या एकजुटीची ताकद दाखविणारा ऐतिहासिक लढा होता असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. छत्रपती संभाजी नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 30 व्या वर्धापन दिना निमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित जाहिर सभेत रामदास आठवले बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान कोणी कधीही बदलू शकत नाही. तरीही काँग्रेस आणि विरोधी पक्ष संविधान बदलले जाईल असा खोटा प्रचार करीत समाजात फूट पाडत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन ला संविधान भवन हे नाव दिले आहे. देशभर 26 नोव्हेंम्बर संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे काम मोदींनी सुरू केले आहे. मुंबईत इंदूमिल ची सर्व जमीन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देऊन तिथे हजार बाराशे कोटींचा खर्च खरून भव्य आंतरराष्ट्रीय भीम स्मारक उभारले जात आहे.या स्मारकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंच भव्य पुतळा उभारला जाणार आहे. त्यामुळे मोदी हे संविधान पूजक आहेत. ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना नुसार देश चालवीत आहेत. असे रामदास आठवले म्हणाले.

मी नाही कुणाचा गुलाम ; नामांतर दिनी करतो जय भीम चा तुम्हाला सलाम;
संविधान लिहून केली आहे माझ्या भीमाने देशात मोठी कमाल;
म्हणून आपण करतो धमाल; माझ्या भीमाने जागी केली गावा गावातील गल्ली
म्हणून मी गाठली आहे दिल्ली; पण मी विसरणार नाही भीम नगर ची गल्ली अशी कविता रामदास यांनी यावेळी सादर केली.

यावेळी रिपाइंचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम; राज्य युवा अध्यक्ष पप्पू कागदे; मिलिंद शेळके; नागराज गायकवाड; ऍड ब्रह्मानंद चव्हाण; दौलत खरात; जिल्हा अध्यक्ष विजय मगरे; ठोकळ; कुंदन लाटे;आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक, सेन्सेक्स पहिल्यांदाच 73 हजारांच्या पार, निफ्टी 22 हजारांच्या वर

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका