तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती; फडणविसांना मुख्यमंत्र्यांचा टोमणा 

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मुंबईत पार पडलेल्या सभेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणातून शिवसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न तर केलाच सोबतच ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व (Hindutva) , केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central systems) त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis and MNS chief Raj Thackeray) यांचा समाचार घेतला.

फडणविसांचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले,  देवेंद्रजी तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले?  तुम्ही चढला असता तर बाबरी तशीच खाली आली असती. मी साक्ष आहे अडवाणी म्हणतात ती जी लोक आहेत ती मराठी होती प्रमोदला पाठवले त्यांचे पण ऐकले नाही मग असे कोण असतील.

उत्तर द्यायची असतील तर महागाई वर द्या. ही केवळ गर्दी नाही हे सगळे वाघ आहेत. गेल्या वेळी त्यांनी भगव्या टोप्या घातल्या पण भगवे मेंदूत असते टोपीत असेल तर संघाची टोपी काळी का?  तुमचे विकृत हिंदुत्व आहे शिवसेनाप्रमुखांनी विचार दिला तुम्ही त्याचा विकार केला. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच केसाने गळा कापला. असं ते म्हणाले.