फडणवीस यांचा त्याग वगैरे काही नाही, मालकांचं ऐकावचं लागेल – निखील वागळे 

मुंबई – महाराष्ट्रात इतक्या दिवसांच्या राजकीय उलथापालथीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांना मुख्यमंत्री करण्यात आले.  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुरुवातीला या सरकारमध्ये फडणवीस सहभागी न झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते मात्र वरिष्ठ  नेतृत्वाच्या आदेशानुसार फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे.

दरम्यान,  एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना या घडामोडींवर जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Senior journalist Nikhil Wagle) यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना (Shivsena) संपवण्यासाठी मोदी-शहांची ही जबरदस्त खेळी आहे. फडणवीस यांचा त्याग वगैरे काही नाही. मालकांचं ऐकावचं लागेल ! असं वागळे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेना तर मुख्यमंत्रीपदाचा जॅकपॅाट (Jackpot) लागला. पण फडणवीस सहजासहजी हा त्याग करतील ही शक्यता नाही.बाहेरुन पाठींबा म्हणजे काही खरं नाही.खरा गेम (Game) तर पुढेच होणार आहे ! असं देखील वागळे यांनी म्हटले आहे.  फडणवीस आता उपमुख्यमंत्री होणार ! अमित शहांचा आदेश कोण धुडकावू शकतो ? सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही ! असं ते आपल्या ट्वीटसमध्ये म्हणाले आहेत.