Asaram Bapu | आसाराम बापू यांच्या उपचार आणि सुटकेसाठी ७ मार्च रोजी पुण्यात उपोषण

जोधपूर तुरुंगात असलेले आसाराम बापू (Asaram Bapu) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत आणि लवकर सुटका व्हावी,या मागणीसाठी पुण्यात ७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आसाराम बापू यांचे अनुयायी आणि विविध संस्थांच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे उपोषण केले जाणार असल्याची माहिती योग वेदांत सेवा समिती,पुणे चे अध्यक्ष चेतन चरवड,सचिव राकेश श्रीवास्तव,दीपकभाई (संत आशारामजी आश्रम, पुणे),सत्येंद्रभाई (संत आशारामजी आश्रम, पुणे),अलका काळे (अध्यक्ष ,महिला उत्थान मंडळ, पुणे),ललिता चौधरी (उपाध्यक्ष, महिला उत्थान मंडळ, पुणे) यांनी पत्रकाद्वारे दिली. योग वेदांत सेवा समिती,युवा सेवा संघ,महिला उत्थान मंडळ या संस्था या उपोषणात सहभागी होणार आहेत.

‘आसाराम बापू (Asaram Bapu) यांना षडयंत्र रचून निराधार प्रकरणात १० वर्षापेक्षा अधिक काळ कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे.त्यांचे वय ८६ वर्ष असून अनेक गंभीर शारीरिक व्याधी त्यांना आहेत.तरीही एकदासुद्धा त्यांना पॅरोल,फर्लो रजा किंवा जामीन देण्यात आला नाही.त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे’,असे या पत्रकात म्हटले आहे.’आसाराम बापू यांनी ५० वर्षांहून अधिक काळ समाजाच्या उत्थानासाठी काम केलेले आहे ,त्यामुळे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा’,असेही या पत्रकात म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन