Sanjay Raut | छत्रपती शाहू महाराज मशाल चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवणार?, संजय राऊत चर्चेसाठी जाणार

Sanjay Raut – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. या जागावाटपादरम्यान कोल्हापूरच्या जागेची सध्या विशेष चर्चा होत आहे. महाविकास आघाडीने कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याबाबत मागे वक्तव्य केले होते. अशातच आता पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचं विधान केलंय.

संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. शिवसेनेची छत्रपती शाहू महाराज यांच्याशी लोकसभेची निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही. काँग्रेसने काय सांगितलं आहे हे आम्हाला माहिती नाही. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे आम्ही सर्वजण मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याशी चर्चा करावी असं आम्हाला सूचवण्यात आलंय. कोल्हापूरची जागा शिवसेनेची असल्यामुळे त्या जागेवरून तुम्ही मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी विनंती आम्हाला छत्रपतींना करावी लागेल. त्यांची मान्यता आहे का? हे आम्हाला विचारावं लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन