जाणून घ्या रणबीर-आलियाच्या संपत्तीचा आकडा नेमका किती आहे ?

मुंबई – दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा-निक जोनास आणि कतरिना कैफ-विकी कौशल यांच्यापेक्षा बॉलीवूडमधील लोकप्रिय मानली जाणारी जोडी म्हणजे आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor). आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची प्रेमकहाणी तर सर्वश्रुत आहे पण रणबीर आणि आलिया यांच्यात संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर वाचा आमच्या या लेखात.

कमाईचा विषय असो की केमिस्ट्री, दोन्हीमध्ये हे कपल्स सगळ्यांना मात देताना दिसतात. रणबीर कपूरकडे आलियापेक्षा दुप्पट संपत्ती आहे. 2021 मध्ये रणबीर कपूरची एकूण संपत्ती 337 कोटी (337 Crores) इतकी होती. रणबीर कपूरची गणना भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. अनेक अभिनेते चित्रपटातून चांगली कमाई करतात परंतु ब्रँड एंडोर्समेंटद्वारे (Brand Endorsement) त्यांना सर्वाधिक नफा मिळतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर एका जाहिरातीसाठी 5 कोटी रुपये घेतो. याशिवाय रणबीरकडे स्वतःच्या महागड्या कारही आहेत. या यादीमध्ये BMW X6, Lexus, Mercedes-Benz GL क्लास, Audi R8 आणि Range Rover सारख्या अनेक कारचा समावेश आहे.BMW X6 ची किंमत करोडो मध्ये आहे. दुसरीकडे, Audi R8 भारतात 2.30 कोटी पासून सुरू होते. कारशिवाय रणबीर कपूरचे मुंबईतील वांद्रे येथे स्वतःचे घर देखील आहे. ज्याची किंमत 30 कोटींच्या वर असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, आलिया भट्टच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती 158 कोटींची (158 Crores) मालकीण आहे. तिला करण जोहरने २०१२ मध्ये लॉन्च केले होते. प्रत्येक चित्रपटातून ती सुमारे 5 ते 8 कोटी कमावते. त्याच वेळी, आलिया ब्रँड एंडोर्समेंटसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते.दुसरीकडे, ती एखाद्या कार्यक्रमाला गेली तर ती सुमारे 30 लाख घेते. 2019 मध्ये, आलियाने इटर्नल सनशाईन प्रोडक्शन नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस उघडले.यासोबतच आलियाने  एड-ए-मम्मा हा लहान मुलांचा कपड्यांचा ब्रँडही सुरू केला.

याशिवाय आलियाचे लंडनमध्ये स्वतःचे घर आहे,जी तिने 2018 मध्ये खरेदी केली होती.त्या मालमत्तेची किंमत 16 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय आलियाचे मुंबईतील वांद्रे आणि जुहू येथे स्वतःचे घर आहे.आलियाकडे रेंज रोव्हर इव्होक, ऑडी A6 आणि Q5 आणि BMW 7 आहे. ज्याची किंमत करोडो आहे. अशा परिस्थितीत या दोघांची एकूण संपत्ती पाहिली तर ती सुमारे ४९५ कोटी आहे.