भारताने इंडीज विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली; अनेक विक्रमांचा झाला पाऊस

अहमदाबाद : भारताने वेस्ट इंडीजविरूद्ध एकदिवसीय मालिका ३-१ अशा फरकाने खिशात घातली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ९६ धावांनी इंडीचा पराभव केला. तर या एकदिवसीय मालिकेत क्रिकेट विश्वात एक भीम पराक्रम झाला आहे. या तिन्ही सामन्यात मिळून एकुण ४२ खेळाडू झेलबाद झाले आहेत. या अगोदर ३९ खेळाडू झेलबाद होण्याचा पराक्रम पाकिस्तान आणि झिंम्बाब्वे यांच्यात १९९५ साली झालेल्या सामन्यात झाला होता.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या तिन्ही सामन्यात वेस्ट इंडीज संघाला चितपट केले. अखेरच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. प्रसिद्ध कृष्णाने अफलातून गोलंदाजींचा नजराणा पेश करत इंडीजच्या खेळांडूना पळता भुई करून सोडलं. तर अय्यरने देखील या सामन्यात ८० धावा चोपल्या.

भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने या मालिकेत एक विक्रम आपल्या नावे केला आहे. कारकिर्दीतील सुरूवातीच्या ७ एकदिवसीय सामन्यात त्यांनी सर्वाधिक १८ बळी घेतले आहेत. यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आणि अजीत आगरकर आहेत. यांनी आपल्या पहिल्या सात एकदिवसीय सामन्यात १६ बळी घेतले आहेत. तर १५ बळीसह तिसऱ्या क्रमांकावर माजी गोलंदाज प्रवीण कुमार आहे. यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर नरेंद्र हिरवाणी, जहीर खान आणि रविचंद्रन अश्विन यांची नावे आहेत. ज्यांनी प्रत्येकी १४ विकेट्स घेतल्या होत्या.

वेस्ट इंडीज विरूद्ध आता टी २० मालिका देखील आयोजित करण्यात आली आहे. ३ सामन्यांची ही टी २० स्पर्धा कोलकाताच्या इडर्न गार्डनमध्ये पार पडणार आहे. या मालिकेतील सामने १६, १८, २० फेब्रुवारी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा या सामन्यांत वेस्ट इंडीज संघाला नमवण्याचा प्रयत्न करणार.