मुंबईच्या माजी महापौर पालिका आयुक्तांवर नाराज; पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

मुंबई – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका सभागृह आणि स्थायी समितीनं घेतलेले निर्णय बदलण्यात आल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

या प्रकरणी मुंबई महापालिकेतील प्रशासकांनी ७ मार्च पर्यंत मंजूर झालेल्या प्रस्तावापैकी एक ते दोन निर्णय बदलण्यात ल्याची माहिती आहे. ७ मार्चपर्यंत मान्य करण्यात आलेले निर्णय बदलू नयेत. प्रशासकांनी झालेले निर्णय बदलून नवीन निर्णय घेत असाल तर तो सभागृहाचा अपमान आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

किशोरी पेडणेकर यांचे आयुक्त व प्रशासक इकबालसिंह चहल यांना पत्र लिहून नगरसेवकांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रशासन फेरफार करत असल्यावरुन किशोरी पेडणेकर यांची नाराजी व्यक्त केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी मी आजचं पत्र दिलेलं आहे, असं म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येण्याआधी पालिकेच्या स्थायी समितीने, सभागृहाने बहुमताने घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेस, भाजपने नाराजी व्यक्त केली होती. भाजपने काही प्रस्ताव रद्द करण्याची मागणीदेखील केली होती. त्याशिवाय काही प्रस्तावांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रस्तावांत बदल होत असल्याची चर्चा सुरू आहे. आता, त्यातच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक असलेले इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे.