Fun Fact: पहाटे किंवा रात्री कुत्रे वाहनांच्या मागे का धावतात? कारण आहे खूपच इंटरेस्टिंग

कुत्रे गाडीच्या मागे का धावतात? जेव्हा कधी रस्त्यावर कुत्र्यांची आमने-सामने गाठ पडते, तेव्हा हा प्रश्न मनात उपस्थित होतो. तसे, या प्रश्नावर अनेक प्रकारची उत्तरे येतात. सर्व उत्तरांचे स्वतःचे तर्कशास्त्र आहे. परंतु सर्वात अचूक आणि थोडे तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटणारे उत्तर म्हणजे संपूर्ण गोष्ट कुत्र्यांच्या प्रदेशांशी संबंधित आहे.

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, कुत्रे सहसा पहाटे किंवा रात्री उशिरा वाहनाच्या मागे धावतात. दिवसा फार क्वचितच कुत्रे गाड्यांचा पाठलाग करताना दिसतात. (Why Dogs Barks And Run After Cars And Bikes Other Vehicles)

मुळात गोष्ट अशी आहे की, कुत्र्यांचा स्वतःचा प्रदेश असतो. ते बर्‍याचदा त्यांचे प्रदेश निश्चित करतात आणि त्या क्षेत्रातील प्रत्येक गोष्ट ओळखतात. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणूनच ते वासाने सर्व काही ओळखतात. एवढेच नाही तर अनेकदा कुत्रे वाहनांच्या टायरवर लघवी करतात. यामागचे गणितही तेच आहे की, ते यावरून आपला प्रदेश ठरवतात आणि लघवीच्या वासाने तो आपला प्रदेश असल्याचे जाहीर करतात. म्हणजे इतर भागातील कुत्र्यांसाठी तो एकप्रकारचा इशारा असतो की, इथपर्यंतची जागा माझी आहे.

लघवीच्या वासावरून ओळख होते
एकंदरीत हेच कारण आहे की, जर एखादे असे वाहन त्या परिसरात शिरले, ज्याच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याच्या लघवीचा वास येतो, तेव्हा कुत्रे भुंकायला लागतात. सहसा ठरलेल्या परिसरात इतर कुत्री घुसखोरी करत नाहीत. परंतु जर इतर कुत्र्यांच्या लघवीचा वास असलेली गाडी आपल्या परिसरात आली की, मग कुत्रे त्या गाडीच्या मागे धावू लागतात आणि ती गाडी पळवण्यात गुंतून जातात.

तसे, पुढच्या वेळी कुत्रा एखाद्या वाहनाच्या मागे धावत असेल तर तो तुम्हाला सावधनातेचा इशारा असेल. कारण याचा अर्थ असा होतो की, तुमच्या परिसरात आलेले ते वाहन तुमच्या आसपासचे नाही. याशिवाय अनेकदा कुत्रे त्या वाहनांच्या मागे धावतात, ज्यामुळे त्यांना किंवा त्यांच्या साथीदारांना दुखापत झालेली असेल किंवा अपघातात त्या वाहनाने त्यांच्या एका साथीदाराचा जीव घेतला असावा.