राज्यात तीस नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के लसीकरण करा – मुख्यमंत्री

मुंबई : विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

आपआपल्या जिल्ह्यात 100 % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही केल्या.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले की, सुरवातीला कोविडची भीती होती. पण आता कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचणीचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा.

कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्त़न ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विश्लेषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरण बाबत धोरण ठरवावे. दीपावली नंतर विशेष उपाययोजना आखून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले.

https://youtu.be/GmVj7hqrh5o

Previous Post

कार्तिक वारी पूर्व नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडून आढावा

Next Post
uddhav thackeray

ठाकरे सरकार निगरगट्ट, उलट्या काळजाचे ‘एस.टी’च्या संपावर तोडगा का नको ?

Related Posts
प्रकाश आंबेडकर

आंबेडकरांवर आरोप करणाऱ्या संतोष बांगरला लवकरच घोडा लावू  – वंचित 

हिंगोली – आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य  करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. आता त्यांनी वंचितचे…
Read More
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान; नाना पटोलेंची खेळी यशस्वी ठरली

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान; नाना पटोलेंची खेळी यशस्वी ठरली

राम कुलकर्णी –  महाराष्ट्रात महाविकास आघाडी आता नावालाच उरली आहे. कारण, भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेतृत्वाचा अपमान…
Read More
Ramdas Athawale | अभिनेत्री कंगणा राणावत मंडी लोकसभा क्षेत्राचा आवाज संसदेत बुलंद करतील

Ramdas Athawale | अभिनेत्री कंगणा राणावत मंडी लोकसभा क्षेत्राचा आवाज संसदेत बुलंद करतील

Ramdas Athawale | बॉलिवुडची लोकप्रिय अभिनेत्री कंगणा राणावत ही अभिनय कलेने देशभरात लोकप्रिय आहे.अभिनया सोबत तिला समाजसेवेची मनस्वी…
Read More