यंदाचा नवरात्रोत्सव होणार अधिकच चैतन्यमय

Shri Suktam

मुंबई : दुर्गा देवी व नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा एक जागरच मानला जातो. देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण केले असता पावित्र्याची आणि मांगल्याची अनुभूती होते. मंत्रोच्चाराने मन प्रसन्न होते. ‘सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि’, प्रस्तुत ‘श्री सुक्तम’ हा मंगलमय मंत्र व्हीडीयो रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ‘श्री सुक्तम’ हा मंत्र म्हणत देवीची उपासना करताना दिसत आहे.

या मंत्राचे वैशिष्टय म्हणजे एरव्ही देवीचा फोटो आणि बाजुला मंत्र सुरू असतो मात्र या मंत्राला एखाद्या गाण्यासारखे व्हिज्युअल्स देण्यात आले आहेत. अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे. या मंत्राचे निर्माता केदार जोशी असून दिग्दर्शक संकेत सावंत आहेत. भारतीय पुराणात मंत्र परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. ‘श्री सुक्तम’ या मंत्राला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाज लाभला आहे.

मंत्रांचे उच्चारण केल्याने तयार होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लवकरच सगळीकडे देवीचे आगमन होणार असून तिच्या आगमनाने चैतन्यमय झालेले वातावरण ‘श्री सुक्तम’ च्या मंत्रोच्चाराने अधिकच उत्साहवर्धक होणार आहे.

Previous Post
Planet Marathi

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’च्या परिवारात नवरत्नांचा सहभाग

Next Post
Tuzi Mazi Yaari

मैत्रीवर भाष्य करणारा ‘तुझी माझी यारी’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

Related Posts
'पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

‘पुरावे नष्ट करायला वेळ दिला’; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

Sandeep Kshirsagar | मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. वाल्मिक कराडने सीआयडीसमोर शरणागती…
Read More
Navratri Festival

श्री नागेश्वर मित्र मंडळाचे कार्य कौतूकास्पद – रमेश थोरात

दौंड ( सचिन आव्हाड) : पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाचे कार्य कौतूकास्पद असून, मंडळ चांगल्या पद्धतीने सामाजिक…
Read More
सलमान खान - सौरभ महाकाळ

अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात सौरभ महाकाळ याची चौकशी सुरू

पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघ्या देशभरात एकच खळबळ उडाली…
Read More