स्पष्ट झालं फायनलचं समीकरण.. ‘या’ दिवशी दिल्ली आणि मुंबई संघात महिला आयपीएलचा अंतिम सामना

मुंबई- महिला आयपीएल २०२३ चा (Womens Premier League 2023) हंगाम शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. शुक्रवारी (२४ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. या सामन्यात मुंबईने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात दमदार प्रदर्शन करत यूपी वॉरियर्सला स्पर्धेतून बाहेर केले. ७२ धावांनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकत मुंबईने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता रविवारी (२६ मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) संघात अंतिम सामना (WPL Final) होईल.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना जिंकत महिला आयपीएलचा पहिलावहिला विजेता बनण्याची संधी दोन्ही संघांकडे असेल. या सामन्यात मुंबई संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, यस्तिका भाटिया, नॅट स्किव्हर आणि पूजा वस्त्राकार यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. तर दिल्लीकडून जेमिमाह रोड्रिगेज, शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांना चांगला खेळ दाखवावा लागेल.