Govt Scheme : शेतकऱ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नेमकी काय आहे ? 

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अटी

  • सदर योजनेसाठी वित्तीय संस्थांमार्फत थेट शेतकऱ्यांना देण्यात आलेली अल्पमुदतीची पीक कर्जे लाभास पात्र राहतील.
  • तीन लाखापर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जास योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. तर तीन लाख रुपयांहून अधिक रक्कमेच्या अल्पमुदती पीक कर्जामध्ये रुपये तीन लाखापर्यंतच्या कर्ज रक्कमेवर व्याज सवलत अनुज्ञेय राहील.
  • ३० जून पूर्वी अथवा बँकेने कर्जधोरणाद्वारे विहीत केलेल्या मुदतीत संपूर्ण परतफेड झालेली कर्ज योजना लाभास पात्र असतील.
  • वित्तीय संस्थांमार्फत नियमित पध्दतीने अथवा किसान क्रेडीट कार्डव्दारा वितरीत केलेली कर्जे योजनेअंतर्गत लाभास पात्र राहतील.
  • १ लाख ६० हजार रक्कमेवरील किसान क्रेडीट कार्डद्वारा वितरीत केलेल्या कर्जास शेतजमीन तारण- गहाण न घेता सोने तारण घेतले असल्यास व अशी कर्जे बँक कर्ज  धोरणानुसार पीकनिहाय कर्जदराच्या मर्यादेत वितरीत केले असल्यास अशा कर्जास योजना लागू राहील.
  • पीक कर्जाच्या उचल तारखेपासुन संपुर्ण कर्ज परतफेडीच्या तारखेपर्यंत जेवढे दिवस कर्जाचा वापर झाला आहे तेवढ्या दिवसासाठी व्याज सवलत अनुज्ञेय राहील.

योजनेअंतर्गत लाभ

सन २०२१-२२ पासून वित्तीय संस्थांकडून रुपये  ३ लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज घेणाया व या कर्जाची प्रतीवर्षी दिनांक ३० जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणा-या शेतक-यांना राज्य शासनाकडून  वार्षीक ३ टक्के दराने व्याज सवलत देण्यात येते. तसेच पीक कर्जाच्या विहीत मुदतीमधील संपुर्ण परतफेडीसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्ररित्या रुपये तीन लाखापर्यंतच्या कर्जावर वार्षिक तीन टक्के दराने व्याज सवलत देण्यात येते.

अधिक माहितीसाठी प्रादेशिक विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व तालुकास्तरीय उपनिबंधक कार्यालये यांच्याशी संपर्क साधावा.