Govt scheme :  केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना काय आहे ? 

योजनेचे स्वरूप

■केंद्र शासनाकडून राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन व बौद्ध या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

■शिष्यवृत्ती अकरावी ते पी. एचडी. व्यावसायिक (डीएड, बीएड, एमएड, आयटीआय) सर्व अभ्यासक्रमांना देण्यात येते. (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून)

योजनेच्या अटी
■अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
■मागील वार्षिक परिक्षेत किमान ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
■अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती तसेच स्टायपेंड योजनेचा लाभार्थी नसावा.
■अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख पेक्षा जास्त नसावे.
■एका कुटूंबातील फक्त २ अपत्यांनांच सदर योजनेचा लाभ घेता येईल.
■शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठी विद्यार्थ्याने पुढील वर्गात प्रवेश घेतलेला असावा.तसेच मागील वार्षिक परिक्षेत किमान ५० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
■विद्यार्थ्याने कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये स्वतःचे खाते उघडणे आवश्यक आहे.

लाभाचे स्वरूप
■केंद्रशासनाच्या नियमानुसार अभ्यासक्रमाचे शुल्क,शिक्षण शुल्क, परिरक्षण भत्ता हे लाभ देण्यात येतात.

■रक्कम अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. नवीन मंजूरीसाठी तसेच नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ- www.scholarships.gov.in

अधिक माहितीसाठी संपर्क- शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे www.dhepune.gov.in.