Govt Scheme : एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत वैयक्तीक शेततळे अस्तरीकरणासाठी योजना काय आहे ?

योजनेचे स्वरुप

फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन सुविधा निर्माण करणे व दुष्काळी भागांमध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे.

योजनेच्या अटी

मागेल त्याला शेततळे, मनरेगा, राष्ट्रीय कृषी विकास योजना, इतर योजना व स्वखर्चाने खोदकाम केलेल्या तळ्याना प्लास्टिक अस्तरीकरण करणारे शेतकरी या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत.

योजनेअंतर्गत लाभ

◆आकारमान -१५×१५×३, खर्च ५६ हजार ५५१ रुपये देय अनुदान – २८ हजार २७५ रुपये.
◆आकारमान -२०×१५×३, खर्च ६३ हजार १९६ रुपये देय अनुदान – ३१ हजार ५९८ रुपये.
◆आकारमान -२०×२०×३, खर्च ८२ हजार ४३६ रुपये देय अनुदान – ४१ हजार २१८ रुपये.
◆आकारमान -२५×२०×३, खर्च ९९ हजार ३८२ रुपये देय अनुदान – ४९ हजार ६७१ रुपये.
◆आकारमान -२५×२५×३, खर्च १ लाख १७ हजार ३९९ रुपये, देय अनुदान – ५८ हजार ७०० रुपये.
◆आकारमान -३०×२५×३, खर्च १ लाख ३५ हजार ४५७ रुपये, देय अनुदान ६७ हजार ७२८ रुपये.
◆आकारमान -३०×३०×३, खर्च १ लाख ५६ हजार १२७ रुपये, देय अनुदान ७५ हजार रुपये.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा