कौतुकास्पद : ग्रीसने पंतप्रधान मोदींना ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले

PM Modi ग्रीस भेट: ग्रीसने पंतप्रधान मोदींना त्यांचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. अथेन्समध्ये शुक्रवारी (25 ऑगस्ट) ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. साकेल्लारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर (Grand Cross of the Order of Honour)प्रदान केला.

परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सांगितले की, ऑर्डर ऑफ ऑनरची स्थापना 1975 मध्ये झाली होती. ग्रीसचे राष्ट्रपती पंतप्रधान आणि मान्यवरांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करतात ज्यांनी ग्रीसचा दर्जा उंचावण्यास हातभार लावला आहे. ग्रीक-भारतीय मैत्रीच्या धोरणात्मक संवर्धनात पंतप्रधान मोदींच्या निर्णायक योगदानाची दखल घेण्यात आली आहे.