Beed Loksabha 2024 | चर्चा ज्योती मेटेंची, पण उमेदवारी बजरंग सोनवणे यांना, बीडमध्ये शरद पवारांनी टाकला डाव!

Beed Loksabha 2024 | काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत त्यांनी बीड आणि भिवंडी येथील उमेदवारांची घोषणा केली आहे. बीड येथून ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती, मात्र शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना उमेदवारी देण्यात आली. परिणामी बीड लोकसभा (Beed Loksabha 2024) मतदारसंघातून भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे अशी लढत पाहायला मिळेल.

दरम्यान बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘नुसती निवडणूक जाहीर झाल्यावर माझी निवडणुकीची तयारी नसते तर पाचही वर्ष मी निवडणुकीसाठी तयारी करत असते. ज्या पद्धतीचा संपर्क, ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीने समाजाच्या कामी येणार आहे ते करत असते. प्रीतम ताई सुद्धा फिरत आहे, काम करत आहोत. ‘ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

‘आता आमचे मित्र पक्ष देखील काम करत आहेत. फक्त हे निमित्त आहे उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. कोणत्याही उमेदवाराला आपला विजय निश्चित वाटणं आवश्यक असतं. जसं त्यांना (सोनावणे) वाटतं, तसं मलाही वाटतं. लाट आणि हा वेगळा विषय झाला, तुम्ही पाच वर्षे लोकांसाठी काय करता? मतदारांना भेटता की नाही या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. बीडची जनता ही फार सुज्ञ आहे आणि ती नक्कीच विचार करतील.’ अस सांगत पंकजा मुंडे यांनी विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत