रॉयल एनफिल्डच्या नवीन बुलेटची वाट पाहताय? कंपनी या दिवशी ऑल न्यू बुलेट 350 लाँच करणार

कंपनीने Royal Enfield च्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या शक्तिशाली आणि सर्वात लोकप्रिय बाईक बुलेट 350 चे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली. 1 सप्टेंबर रोजी रॉयल एनफील्ड आपली सर्वात लोकप्रिय बाइक बुलेट 350 (2023) लाँच करणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

कंपनीने आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे सांगितले की 2023 Royal Enfield Bullet 350 1 सप्टेंबर 2023 ला लॉन्च होईल. तुम्हीही या बाईकची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. मात्र या बाईकचे डिझाईन कसे असू शकते याबाबत कंपनीकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, ही बाईक 1932 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. या बाईकमध्ये ३५० सीसीचे पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. बाईकमध्ये 13.5 लीटर इंधन क्षमता उपलब्ध आहे. ही बाईक 4000 rpm वर 28nM चा टॉर्क जनरेट करते आणि 19.1 bhp पॉवर जनरेट करते. बाईकमध्ये 4 सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड आणि फ्युएल इंजेक्शन इंजिन आहे.

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर या बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस देण्यात आला आहे. ही बाईक 6 कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. बाइकला 135 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. बाईकमध्ये तुम्हाला 6 स्पीड गिअरबॉक्स मिळेल. नवीन बुलेट 350 मध्ये काही बदल पाहिले जाऊ शकतात.