गोरेगाव येथील आगीतील दुर्घटनाग्रस्तांची पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विचारपूस

Goregaon Building Fire Case : गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील जय भवानी इमारतीला आज भीषण आग लागली होती. यात काही जणांचा मृत्यू झाला. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयमध्ये (Bahasaheb Thackeray Hospital) जाऊन आगीतील जखमींची मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी विचारपूस केली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.

पालकमंत्री लोढा म्हणाले की, या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे रूग्णालय, लाईफलाईन मेडीकल आणि कूपर रूग्णालयमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या घटनेवर लक्ष असून, दुर्घटनाग्रस्तांवर वेळेत उपचार व मदतीसाठी शासन तत्पर असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

यावेळी आमदार विद्या ठाकूर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा