चौकशीच्या नावाखाली सोनिया गांधी  आणि खा. संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरु  – शिंदे 

Solapur – नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या ( ईडी ) पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर छापे टाकले(ED raids). यादरम्यान 10 जनपथवर झालेल्या बैठकीची कागदपत्रेही तपासली जात आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह 10 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या,  देशात राजकारणाची पातळी ही खलावत आहे. सध्या जे राज्यात आणि केंद्रात सुरु आहे ते लोकशाहीला घातक असून (BJP Party) भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून कुठेतरी लोकशाहीची हत्या केली जात आहे. (Central Institutions) केंद्रीय संस्थांचा उपयोग कशाप्रकारे सुरु आहे हे सर्व देशभरातील नागरिक पाहत आहे. सध्या केवळ हम बोले सो कायदा अशी स्थिती असून असेच सुरु राहिले तर हूकुमशाहीचा उदय झाल्याशिवाय राहणार नसल्याचे (MLA Praniti Shinde) आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.

सध्या दिल्लीत चौकशीच्या नावाखाली सोनिया गांधी यांना तर राज्यात खा. संजय राऊत यांना त्रास देण्याचे काम सुरु असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे या चौकशी दरम्यान, केंद्रीय संस्थांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.2015 साली बंद झालेल्या विषय आता नव्याने उकरून त्याबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अनेक वेळा चौकशीसाठी अधिकाऱ्यांना घरी पाठवावे अशीही मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. मात्र, चौकशीमध्ये काहीही निष्पन्न झाले नाही तरी केवळ यामधून त्यांना त्रास व्हावा हाच उद्देश आहे. त्यामुळेच पक्षाच्या प्रमुख असून त्यांना दहा दहा वेळा ईडी चौकशीला बोलवले जाते. तर दुसरीकडे राहुल गांधी यांचीदेखील 6-6 तास चौकशी केली जात असल्याचे प्रणिती शिंदे यांनी सांगितले आहे.