इंस्टाग्रामच्या दुनियेत हार्दिकची हवा! बनला २५ मिलियन फॉलोवर्स असणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटर

भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या विश्रांतीवर आहे. आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या चाहत्यांमध्ये वर्चस्व गाजवतो. सोशल मीडियावर त्याला करोडो चाहते फॉलो करतात. हार्दिक पांड्याने नुकतीच सोशल मीडियाच्या जगात एक मोठी कामगिरी केली आहे.

हार्दिक पांड्या इंस्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा गाठणारा (Hardik Pandya 25 Million Instagram Followers) जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. विशेष म्हणजे, राफेल नदाल, रॉजर फेडरर, मॅक्स वर्स्टॅपेन आणि एरलिग हॅलँड सारख्या काही जागतिक स्टार्सपेक्षा हार्दिकचे इंस्टाग्राम फॉलोअर्स जास्त आहेत.

इंस्टाग्रामवर ही उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना हार्दिक म्हणाला, ‘माझ्या सर्व चाहत्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. माझे सर्व चाहते माझ्यासाठी खास आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.’