स्वरा भास्कर लव्ह जिहादचा उल्लेख करत म्हणाली, “भारतात अशा मूर्खपणाला…”

Safari Park : कोलकाता (Kolkata) येथील बंगाली सफारी पार्कमध्ये (Safari Park) सिंह-सिंहिणीची (lion-lioness ) जोडी सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. 12 फेब्रुवारी रोजी या सिंह-सिंहिणीच्या जोडीला त्रिपुरातील विशालगड येथील प्राणी संग्रहालयातून बंगाल सफारी पार्कमध्ये आणण्यात आले. पण सफारी पार्कमध्ये आणलेल्या सिंहिणीचे नाव सीता (Sita), तर वाघाचे नाव अकबर (Akbar) असे असल्याने वाद निर्माण झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी सिंहिणीला सीतेचे नाव देण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. याच कारणामुळे सिंहिणीचे नाव बदलण्यासाठी विहिंपतर्फे शुक्रवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयात (High Court) राज्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) एक पोस्ट केली आहे. स्वरा भास्करने एक्सवर पोस्ट शेअर करत आक्षेप नोंदवणाऱ्यांची खिल्ली उडवली आहे. “संघींवर आता सिंहांच्या लव्ह जिहादचा धोका आहे. आपण भारतात या अशा मूर्खपणाला मध्यवर्ती स्थान दिलं आहे!” असं स्वराने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं