मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिलेच पाहिजे; अमृता फडणवीस यांची मागणी

मुंबई – राज्यातील मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) झालेला विस्तार आणि त्या विस्तारामध्ये महिलांना स्थान देण्यात आले नसल्याने विरोधकांनी टीका केली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी क्षेत्र कोणतंही असो महिलांना स्थान हे दिलेच पाहिजे अशा टिप्पणी त्यांनी केली आहे.

अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझीही महिला म्हणून इच्छा हीच आहे की, महिलांना मंत्रिमंडळ असो किंवा इतर क्षेत्र असो त्यांच्या हिम्मतीवर त्यांना स्थान दिलं पाहिजे, त्यांनी मागणी करतात म्हणून नाही तर त्यांच्या कार्यशैलीवर, कामाच्या प्रभूत्वावर त्यांना सर्व ठिकाणी स्थान दिलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महिलांनी मागणी करुन मिळवलेल्या पदापेक्षा त्यांनी त्यांच्या कामाच्या कौशल्यावर म्हणजे कामातील प्रभूत्वावर मिळवलेल्या जागेवर नेहमीच त्यांचा आदर राखला जातो आणि तो आदर वेगळाच असतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. मागणीनुसार पद न देता त्यांच्या कामाच्या कौशल्यावर त्यांना पद दिले पाहिजे असंही त्यांनी आपले मत मांडले.