‘या’ देशात पती-पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशीही लैंगिक संबंध ठेवणे पडणार महागात; 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो

 कतार – स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याची मजा काही औरच असते. तेही जेव्हा सामने विश्वचषकाचे असतात. मस्ती, पार्टी, गोंगाट… हे सगळं मैदानावर आणि मैदानाबाहेरही पाहायला मिळतं. मात्र नोव्हेंबरमध्ये कतारमध्ये होणारा फिफा विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

कतारमध्ये सेक्सबाबत कडक नियम आहेत(Strict rules about sex) . पती किंवा पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशीही संमतीने लैंगिक संबंध ठेवणे देखील बेकायदेशीर आहे आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे(Having consensual sex) . त्यामुळे कतारमध्ये येणारे अविवाहित जर कोणाशी लैंगिक संबंध(Sex)  ठेवताना पकडले गेले तर पोलीस त्यांना अटक करू शकतात. समलैंगिक संबंधात (Homosexuality) राहणाऱ्या जोडप्यावरही कारवाई होऊ शकते.नियम न पाळणाऱ्या दर्शकांना एक-दोन नव्हे तर ७ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

यंदाच्या फुटबॉल विश्वचषकात वन नाईट स्टँडवर (One Night Stand) पूर्णपणे बंदी घालण्यात येईल, असा इशारा कतारने येथे येणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना दिला आहे. यामध्ये कोणीही सहभागी असल्याचे आढळून आल्यास तो सात वर्षांसाठी तुरुंगात जाऊ शकतो.’डेली स्टार’ने कतार पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे की, तुम्ही पती-पत्नी म्हणून येत असाल तर ठीक आहे. पण जर तुम्ही या फॉर्ममध्ये येत नसाल तर सेक्स तुमच्यासाठी दूरचे स्वप्न ठरू शकते.

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदाच सेक्स सक्तीचा आहे. गोंगाट करणाऱ्या पार्ट्यांनाही बंदी आहे. मॅचनंतर मद्यपान करणे आणि पार्टी करणे हा विश्वचषकातील चाहत्यांचा ट्रेंड आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. कतारमध्ये विवाहबाह्य लैंगिक संबंध (Extramarital sex) आणि समलैंगिकता बेकायदेशीर आहे. अशा परिस्थितीत कतार हॉटेल्स वेगवेगळ्या आडनाव असलेल्या जोडप्यांना रूम देत नाहीत.

कतारमधील फिफा २०२२ विश्वचषक स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नासेर यांनी म्हटले आहे की, प्रत्येक चाहत्याची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मुक्त प्रणय हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही. इथे कोणी येत असेल तर देशाचे नियम पाळावे लागतात.  दरम्यान, कतार फुटबॉल असोसिएशनचे सरचिटणीस मन्सूर अल अन्सारी यांनी सांगितले की, खेळांमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगीत झेंड्यावरही बंदी घालण्याचा विचार करत आहोत. ते म्हणाले की जर तुम्हाला LGBTQ बद्दल तुमचा दृष्टिकोन प्रदर्शित करायचा असेल तर तो स्वीकारलेल्या समाजात प्रदर्शित करा.