Pankaja Munde | राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, पण…; पंकजा मुंडेंनी सांगितला पुढील प्लान

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी गाव चलो अभियानात बीडमधील पौंडुळ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादावेळी पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलंय. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला. माझा वनवास झाला. तुम्ही किती प्रेम करता हे पाहण्यासाठी हे सर्व झालं असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटलं की, मला आजं इथं कुंकू लावलं. कडक लक्ष्मीचं रूप दिलं. पंतप्रधान मोदींनी आम्हाला गावागावात जायला सांगितलं. मोदींनाही त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. चहा विकावा लागला. शाळेत फी भरायला पैसे नव्हते. अनंत अडचणी आल्या.

२०१४ ची निवडणूक दुर्दैवानने आपल्यासाठी चांगली ठरली नाही. निवडून आल्यानंतर काही दिवसातच मुंडे साहेब आपल्यातून गेले. २००९ मध्ये मी राजकारणात आले आणि संघर्ष सुरू झाला. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या म्हणाले. बाबा यमराजापुढे अपयशी ठरले. जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं त्यांनी सांगितलं. आपली जात वंचित आहे आणि त्यांच्यासाठी आपण काम करायचं आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या : 

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला CAA ची आठवण, नेहमीप्रमाणे CAA हाही ‘चुनावी जुमलाच’

‘ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या…’, पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया