’वाय’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीला

Pune – गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ज्या चित्रपटाला आपला ‘पाठिंबा’ दर्शविला, त्या ‘वाय’ (marathi movie Vaay’s poster released) या मराठी चित्रपटाचे पोस्टर अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे.

या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे (Mukta Barve) एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर (Ajit Suryakant Vaadikar) म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल (First hyperlink movie in marathi). या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘ हायपरलिंक ‘ हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Previous Post

राज्यसभा उमेदवारीबाबत वडील शाहू महाराजांच्या ‘त्या’ दाव्यानंतर संभाजीराजेंचं लक्ष्यवेधी ट्वीट!

Next Post

वीजबिलांचा भरणा केल्याशिवाय तरणोपाय नाही – अजित पवार

Related Posts
rain

आंध्र प्रदेशला पुराचा बसला फटका; शेतीसह पशुधनाचीही झाली मोठी हानी 

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला अवेळी पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. रायलसीमा राज्य आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण…
Read More
Moscow Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन पुन्हा आमने-सामने 

Moscow Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यानंतर रशिया-युक्रेन पुन्हा आमने-सामने 

Russia-Ukrain War : रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या क्रोकस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Moscow Terrorist Attack) मृतांची संख्या 133…
Read More
75 हजार लोकांच्या खात्यात चुकून पाठवली1300 कोटी रुपयांची रक्कम

75 हजार लोकांच्या खात्यात चुकून पाठवली1300 कोटी रुपयांची रक्कम

नवी दिल्ली- सॅंटेंडर बँकेच्या 2 हजार खात्यांमधून बँकेने 75 हजार लोकांच्या खात्यात चुकून रक्कम पाठवली आहे. आता पाठवलेले…
Read More